Breaking

Nitin Gadkari, Anup Dhotre : धोत्रेंचा पाठपुरावा; गडकरींची मंजुरी !

Two under passes will be constructed on the national highway : राष्ट्रीय महामार्गावरील दोन अंडरपासचा मार्ग मोकळा

Akola राजकीय नेत्यांनी ठरवले तर कोणतीही समस्या क्षणार्धात मार्गी लागू शकते. याचाच प्रत्यय अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी परिसरातील रस्त्याच्या समस्येबाबत आला. खासदार अनुप धोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन अंडर पासचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी धोत्रे यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पासाठी 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

अकोला शहरापासून जवळच एमआयडीसी समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाखाली, तसेच निपाणा या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाखालून अंडरपासची निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाकडून तब्बल 104 कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला असून, लवकरच दोन अंडरपासची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे एमआयडीसीतील मालवाहतुकीसाठी सुविधा होणार असून, हा योग निपाणा गावकऱ्यांचा रहदारीचा प्रश्न सुद्धा निकाली निघणार आहे.

Tipeshwar Wildlife Sanctuary : टिपेश्वरमधील वाघाची बार्शीत दहशत

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर शिवणी, शिवर नजीक उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरून ‘एमआयडीसी’मध्ये जाणाऱ्या किंवा ‘एमआयडीसी’तून महामार्गावर येणाऱ्या मालवाहू वाहनांना मोठी अडचण निर्माण झाली. या वाहनांना फेऱ्याने प्रवास करावा लागतो. तसेच राष्ट्रीय महामार्गामुळे निपाणा गावाजवळ देखील गावकऱ्यांना रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली होती. या दोन्ही ठिकाणच्या समस्येबाबत ‘एमआयडीसी’ मधील उद्योजक, व्यावसायिक तसेच निपाणा येथील गावकऱ्यांनी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे आपली समस्या मांडली होती.

या समस्येची दखल घेऊन खा. धोत्रे व आ. सावरकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत या दोन्ही ठिकाणची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी अंडरपास व वळण रस्त्याची आवश्यकता असल्याचे दिसून आल्यानंतर त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्यात आला.

CM Devendra Fadnavis : आम्ही भूमिपूजन केले, आम्हीच उद्घाटन करतोय!

एमआयडीसी जवळ अप्पू पुतळ्यासमोर राष्ट्रीय महामार्गाला वळण रस्ता व अंडरपास निर्मितीसाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निपाणा गावाजवळ अंडरपास निर्मितीसाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लवकरच दोन्ही अंडरपासचे काम प्रारंभ होणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योजक व्यावसायिकांसह निपाणा येथील गावकऱ्यांनी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांचे आभार व्यक्त केले.