Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठे चे अकाली निधन

It reached every household through Marathi and Hindi serials, but : मराठी, हिंदी मालिकांमधून घराघरात पोचली पण…

Mumbai : मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. पहाटे मीरा रोड येथील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी मी नांदायला’ अशा मालिकांमधील विविध भूमिका असो किंवा हिंदी मालिकांमधील ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या मालिका – प्रियाने प्रत्येक पात्रात आपले वेगळेपण दाखवले.
तीच्या अभिनयामुळे तिची घराघरात ओळख निर्माण झाली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत ती झळकली.

Maratha movement : “उदयनराजे जरांगेंच्या मंडपात बसलं पाहिजे; पण हे भाजपचे हस्तक

गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत असताना प्रियाने पुन्हा काम सुरु केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांत आजाराने पुन्हा उग्र रूप धारण केले. उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ तयार करा !

अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत प्रियाला श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले “प्रिया माझी उत्तम सहकलाकारच नव्हे तर माझी चुलत बहीण होती. तिची मेहनत, कामावरील श्रद्धा व लढाऊ वृत्ती कौतुकास्पद होती. ती खऱ्या अर्थाने लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली.”