Protest for loan waiver : दारूबंदीसाठी मोटारसायकल रॅली; तहसीलदारांना निवेदन

Motorcycle rally demanding alcohol ban : शेतकरी कर्जमाफीचीही मागणी, पळशी-झाशी गावात आंदोलन

Sangrampur तालुक्यातील पळशी-झाशी ग्रामसभेत गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीला पूर्णविराम देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी एकजुटीने मोटारसायकल रॅली काढून तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.

१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या ग्रामसभेला माजी सैनिक मनोहर दोरेकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी मंचावर सरपंच प्रियांका मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, माजी सैनिक गजानन वाघ, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ram Shinde Vs Ajit Pawar : पराभवामागे पवार कुटुंबाचा कट

ग्रामसभेत अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासाठी ठराव पारीत झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी मोटारसायकल रॅली काढून संग्रामपूर तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.

या प्रसंगी सुजित बांगर, राहुल मेटांगे, अभयसिंह मारोडे, तसेच सरपंच आणि उपसरपंचांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गोपाल दोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष निकाळजे यांनी मानले. ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट आणि युवकांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Bacchu Kadu : सरकारमधील लोकांकडून मतदारांची लिस्ट बदलण्याची होती ऑफर!

गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. “प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास गावकरी तीव्र आंदोलन छेडतील,” असा इशारा सरपंच प्रियांका मेटांगे यांनी दिला