Two Crore deal of scaly cat was foiled : तस्करांना अटक; खवले मांजरही केले जप्त
Wardha खवले मांजरच्या खरेदी विक्रीचा सौदा दोन कोटींत होणार होता. मात्र, वनविभागाच्या पथकाने आणि पुलगाव पोलिसांच्या मदतीने हा सौदा उधळून लावला. पोलिसांनी दि. २७ रोजी सायंकाळच्या सुमारास पुलगाव येथील काॅटन मिल मॉलच्या परिसरातून कारसहित सहा तस्करांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून खवल्या मांजर जप्त केली.
अमरावती येथून कारने काही लोक खवल्या मांजर घेऊन येत असल्याची माहिती वनविभागाला होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क करून पोलिस मदत मागितली. अखेर पोलिसांच्या मदतीने वनविभागाच्या टीमने सहा तस्करांना खवल्या मांजरीसह ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
पोलिसांच्या मदतीने सहाही तस्करांना पकडल्यानंतर वर्ध्याहून पुलगाव गेलेल्या वनविभागाच्या टीमला तस्करांना स्वाधीन केले. वन अधिकाऱ्यांच्या टीमने सहाही आरोपींना सोबत घेत वर्ध्यातील वनविभागाच्या कार्यालयात जाण्यासाठी रवाना झाले. आरोपींमध्ये दोन आरोपी पारधी बेडा आगरगाव, दोन आरोपी अमरावती, एक पुलगाव येथील सरदारपुरा आणि एक कारचालक असल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याने नावे मात्र कळू शकली नव्हती.
District Bank Director Disqualification Case : बच्चू कडूंना संचालकपदासाठी अपात्र का ठरवू नये?
पुलगाव कॉटन मिल मॉल परिसरात खवल्या मांजर घेऊन आरोपी येत होते. पोलिस तांत्रिक तपास करीत होते. मात्र, आरोपींनी चार ते पाच वेळा त्यांचे लोकेशन बदलवून पोलिसांना चकमा दिला. अखेर आरोपींना मॉलच्या परिसरात कारसहित अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या निर्देशात सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव, सुभाष गावड, संदीप बोरबन, आदींसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.
आरोपींनी कार भाड्याने घेतली होती. त्यामुळे कारचालकाला नेमका प्रकार काय, याची किंचितही माहिती नव्हती. मात्र, चालक त्यांच्या साेबत असल्याने वनविभागाच्या टीमने कारचालकालाही ताब्यात घेतले.