The first blow in the Mahayuti is on Ajit Pawar’s own party : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनीच स्वतःच्या पक्षाची कोंडी करून घेतली
Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि तांत्रिक अडचणींनी भरलेली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे उमेदवारांचे अर्ज केवळ ऑनलाइन न भरता, ते प्रत्यक्ष स्वरूपातही स्वीकारावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाशी थेट चर्चा केली आहे.
उमेदवारांचा २० पानी अर्ज हा सर्वसामान्य व्यक्तीसाठी भरणे अवघड ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्जामध्ये मागील निवडणुकीतील मते, निवडणूक खर्च, व इतर तांत्रिक तपशील विचारले जात आहेत. ही माहिती आयोगाकडे आधीच उपलब्ध असताना पुन्हा मागवली जाणे, हे अनावश्यक आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी अनेक उमेदवारांचे अर्ज नाकारले जाऊ शकतात. हे लोकशाहीस घातक असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वडेट्टीवार यांनी आयोगासमोर ठामपणे मांडणी केली की, अर्ज स्वीकारण्याची संधी दोन्ही माध्यमांत ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध करून दिली पाहिजे.
महायुतीत पहिला आघात अजित पवारांवर करण्यात आला आहे. या वडेट्टीवार यांनी पुण्याच्या जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत अजित पवार आणि पार्थ पवारांवरही गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की,
पुणे-पीसीएमसीतील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहेत. पण निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनीच स्वतःच्या पक्षाची कोंडी करून घेतली आहे. काँग्रेसच्या मते, येणाऱ्या निवडणुकीत भाजपला पूरक भूमिका पार पाडावी, या हेतूने अजित पवार यांचा पक्ष कमजोर करण्याचा डाव सत्ताधारी महायुतीकडून रचला जात आहे. महायुतीतील पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल. त्यांना सत्तेबाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.
NCP Ajit Pawar : ताजबाग पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अस्मिता एल्गार’
स्थानिक आघाड्यांवर चर्चा..
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विभिन्न ठिकाणी स्थानिक आघाड्यांबाबत चर्चा सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आघाड्यांचे स्वरूप स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले. एकूणच, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंत दूर करून पारदर्शक आणि सुलभ प्रणाली लागू करण्याची मागणी केली असून, आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे संकेत दिले आहेत.








