Pune land scam : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात नवीन वळण

Anjali Damania’s serious allegations against Sheetal Tejwani : शीतल तेजवानींबद्दल अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप

Pune : कोरेगाव पार्क येथील पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणात आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने या परिसरातील जमीन खरेदी केल्याचा आरोप असून, तो व्यवहार वादात अडकला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी या व्यवहारात शीतल तेजवानी यांच्या भूमिकेबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

दमानिया यांनी सांगितले की, “हा जमीन व्यवहार पार्थ पवार रद्दच करू शकत नाहीत. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ही जमीन गायकवाड कुटुंबाला महारवतन म्हणून मिळालेली होती. त्यानंतर ती खालसा झाली आणि ती परत कधीच दिली गेली नाही. त्यामुळे त्यांच्या नावावर ती जमीन होणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी इतरांकडून हा व्यवहार करण्यात आला,” असं त्या म्हणाल्या.

Local Body Elections : पहिल्या दिवशी ‘ड्राय डे’! राजकीय पक्षांचे ‘वेट अँड वॉच’

दमानिया यांनी शीतल तेजवानी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “शीतल तेजवानी यांनी 11 हजार रुपये भरल्याचं पत्र 30 डिसेंबर 2024 रोजी कलेक्टरना पाठवलं, पण कलेक्टरांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. मूळात शीतल तेजवानी ज्या पावर ऑफ अटर्नीबद्दल बोलत आहेत, ती नोंदणीकृतच नाही. जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी रजिस्टर पावर ऑफ अटर्नी आवश्यक असते,” असं त्या म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी आणखी स्पष्ट केलं की, “हा व्यवहार रद्द करण्यासाठी काही ठराविक प्रक्रिया असते. शीतल तेजवानी ही जमीन मालक नसल्यामुळे तिला सही करण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे ना ती, ना पार्थ पवार यांची अमोडिया कंपनी हा व्यवहार रद्द करू शकते. सरकारने सिव्हिल कोर्टात दावा दाखल केल्याशिवाय हा करार रद्द होऊ शकत नाही.”

Health Department of Maharashtra : रेफर टू बुलढाणा रुग्णालय! शिवसेनेकडून उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण

दमानिया यांच्या मते, मीडियामध्ये फिरणाऱ्या “42 कोटी रुपये भरल्यानंतर व्यवहार रद्द होईल” या बातम्या चुकीच्या आहेत. “हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार फक्त मूळ मालक किंवा न्यायालयाकडेच आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

या खुलाशांमुळे पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, शीतल तेजवानी यांच्या भूमिकेबद्दल अधिक चौकशीची मागणी आता जोर धरत आहे.