Pune landscam : अजित पवार यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे !

Shinde Sena’s demand for a big leader, spark in mahayuti : शिंदे सेनेच्या मोठ्या नेत्याची मागणी, महायुतीत ठिणगी

Pune : 9पुण्यातील कोरेगाव पार्कच्या प्रकरणानंतर आता आणखी एका जमीन गैरव्यवहाराचा भंडाफोड झाला आहे आणि या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचं नाव पुन्हा एकदा समोर आलं आहे. बावधन परिसरातील जमिनीच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून सह जिल्हा निबंधक कवर्ग 1 यांनी या संदर्भात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर कृषी विभागाच्या मालकीच्या 5 एकर जमिनीतील घोटाळाही प्रकाशात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अमेडिया कंपनी आणि तिच्या भागीदारांची नावे समोर आली आहेत.

या कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के आणि दिग्विजय पाटील यांचा 1 टक्के वाटा असल्याचं दस्तऐवजांवरून स्पष्ट झालं आहे. दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर शीतल तेजवानी आणि इतर काही आरोपींवरही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पार्थ पवार यांच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Sanjay Gaikwad : शिंदेंचा उमेदवार पाडण्यासाठी भाजपनेत्याने १ कोटी रुपये घेतले

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष चौकशी समिती (SIT) गठीत केली असून या समितीत आठ अधिकारी असतील. या SIT ला सर्व कागदपत्रांसह एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

या प्रकरणावरून आता उद्धव सेना, काँग्रेस आणि शिंदे सेना यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. उद्धव सेनेने पार्थ पवार यांच्या चौकशीसह अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर आता शिंदे सेनेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट “पार्थ पवार चुकलेच आहेत” असे म्हणत दादांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

धंगेकर म्हणाले, “कोंढवा जमीन व्यवहारात संपूर्ण सिस्टीम चुकली आहे. गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवारांना का वाचवलं गेलं हे कळत नाही. जैन बोर्डिंग आणि कोंढवा दोन्ही व्यवहार घोटाळे आहेत. एका प्रकरणात पोलीस कारवाई होते आणि दुसऱ्यात नाही, असा दुहेरी न्याय का?” त्यांनी पुढे टोला लगावत म्हटलं, “चुकीला माफी नाही. पार्थ पवार चुकलेत, चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी पैसे परत द्यायचे असं चालत नाही. वडिलांची पॉवर मुलगा वापरतो, पण यावर कडक कारवाई व्हायलाच हवी.”

Local Body Elections : महायुती टिकवा, कार्यकर्ता वाचवा! शिंदे सेनेचे भाजपला आवाहन

धंगेकरांनी अजित पवार यांच्यावरही थेट टीका करत म्हणाले, “दादांचं कोणी ऐकत नाही, पक्षात कोणी ऐकत नाही आणि आता मुलं मोठी झालीत ती देखील ऐकत नाहीत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. या प्रकरणाची चौकशी आता SIT करत असली तरी राजकीय पातळीवर पार्थ पवार यांच्याविरोधात वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चाललं आहे.