Pune Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आज होणार सादर !

The preliminary report of the inquiry into Pune’s Mangeshkar Hospital blamed the hospital : प्राथमिक अहवालामध्ये रुग्णालयावर ठेवला होता ठपका

Pune : १० लाख रुपये अग्रीम रक्कम न भरल्यामुळे तनिषा भिसे या महिलेला पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अॅडमिट करून घेतले नाही. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी राज्य सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने प्राथमिक अहवाल तात्काळ सादर केला होता. ही समिती सविस्तर अहवाल आज सादर करणार आहे.

पुणे येथे आज (७ एप्रिल) एका बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान मंगेशकर रुग्णालयाने भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम मागितलीच नव्हती, असा दावा मेधा कुळकर्णी यांनी केला आहे. त्यावर सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, असे आवाहन भिसे कुटुंबियांनी दिले आहे. या प्रकरणी आता पुढे काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Mahayuti Government : अंगणवाड्यांचं रुपडं पालटणार, डागडुजी होणार!

आरोग्य विभागाच्या महत्वाच्या समितीने आरोग्य विभागाला सादर केलेल्या प्राथमिक अहवालामध्ये रुग्णालयावर ठपका ठेवला होता. तनिषा भिसेंना अॅडमिट करून न घेणे ही मोठी चूक असल्याचे अहवालात म्हटले होते. रुग्णालय व्यवस्थापनाच्या चुकीमुळेच रुग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागले, असे या समितीने आपल्या प्राथमिक अहवालात म्हटले होते. आता सविस्तर अहवालामध्ये काय काय बाबी नमूद आहे, याची प्रतीक्षा केली जात आहे. रुग्णालयातील सर्व कागदपत्रांचा अभ्यास समितीने केला आहे.

Nitin Gadkari : इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती ! गडकरींनी ऐकवली कविता..

मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. सर्व स्तरांतून कठोर कारवाईची मागणी केली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने हे प्रकरण हाताळले. या घटनेच्या चौकशीसाठी तातडीने समित्या स्थापन केल्या. त्यातील आरोग्य विभागाची समिती ही महत्वाची समिती होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. रुग्णालय व्यवस्थापनाला जेवढी या अहवालाची प्रतीक्षा आहे, तेवढीच विरोधकांनादेखील आहे. अहवाल आल्यानंतर काय होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.