Breaking

Devendra Fadnavis on Mahametro : पुणेकरांना ‘नागपूर’बद्दल शंका होती !

Pune raised doubts whether Nagpur company will build Pune Metro : ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

Nagpur मेट्रोची सुरुवात करताना नागपूर मेट्रो कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुण्याच्या मेट्रोचे काम या कंपनी मार्फतच सुरू करण्यात आले. पण पुणेकरांनी नागपूर कंपनी पुण्याची मेट्रो तयार करेल का, अशी शंका निर्माण केली. त्यामुळे महामेट्रो ही कंपनी स्थापन करण्यात आली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ABP MAJHA एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक Sarita Kaushik यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ Better Than The Dreams या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

माझी मेट्रो देशात सर्वात जलद गतीने पूर्ण झालेली मेट्रो आहे. जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल झाल्याने नवीन कार्य संस्कृती निर्माण झाली आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक ब्रजेश दिशीत उपस्थित होते.

Dr Neelam Gorhe : शेतकरी म्हणाले, ‘ताई तुम्ही होत्या म्हणून…’

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यात येत आहे. त्यामुळे जनतेलाही चांगल्या सेवा मिळणार आहेत. मेट्रोने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नियोजनामुळे देशातील इतर राज्यांतूनही मागणी होत आहे, असंही ते म्हणाले.

The body was found suspicious condition : संतप्त नातेवाईकांनी चौकातच दिला ठिय्या !

राज्यातील पहिली मेट्रो मुंबईत सुरू झाली. ती अकरा वर्षांत अकरा किलोमीटरचा टप्पा पूर्ण करु शकली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ पाच वर्षात तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. नागपूर मेट्रोने चार वर्षात 32 किलोमीटर पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणेच पुणे मेट्रोसुद्धा अत्यंत जलद गतीने पूर्ण झाली आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. त्याचवेळी या कामाचे श्रेय त्यांनी तत्कालीन प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांना दिलं.