Serious allegations by social activist Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप
Mumbai : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात आता राजकीय षडयंत्राचा वास येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला आहे. दमानिया यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रेव्ह पार्टी म्हणजे मोठ्या संख्येने लोक, मोठ्या आवाजात संगीत, डान्स, ड्रग्स आणि मद्यपान.
दमानिया यांनी सांगितलं, एकनाथ खडसे यांनी 2016 पासून त्यांना त्रास दिला असला तरी सत्य काय आहे ते सांगणे आपली जबाबदारी आहे. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. पोलिसांनी या प्रकरणाची सुरुवात चुकीच्या माहितीने केली. सुरुवातीला केवळ काही नावेच समोर आणली गेली आणि उर्वरितांची नावे लपवण्यात आली. पोलिस आयुक्तांनी दिलेलं विधानही धक्कादायक होतं. दमानिया यांनी याला राजकीय षडयंत्र म्हटलं आणि सांगितलं की त्यांच्या बुद्धीनुसार हे सर्व मुद्दाम घडवलं गेलंय, असं स्पष्टपणे दिसतं.
Maharashtra politics : महाराष्ट्रात आता ‘फडणवीस ॲक्ट’ हा नवीन कायदा लागू !
त्यांनी असंही म्हटलं की पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेवल्याचा दावा केला जातो पण पहिल्या दिवशी ड्रग्स सापडली नाहीत म्हणून कारवाई थांबवण्यात आली. नंतर जे ड्रग्स सापडले ते कोण ठेवून गेलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या कारवाईत पारदर्शकता नाही आणि ही प्रक्रिया संशयास्पद आहे, असा आरोप त्यांनी केला.
दमानिया यांनी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यावर ईडीने घेतलेल्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली. जर पवार हे मंत्री दादा भुसे यांचे नातलग असतील आणि त्यांनी भ्रष्टाचार केला असेल, तर त्याचे उत्तर सर्व संबंधितांनी द्यावे, असं त्यांनी म्हटलं. त्यांनी पवार यांची पात्रता आणि विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केला. ते 17 तारखेला सेवानिवृत्त झाले होते, तरी ते 28 पर्यंत का थांबले? आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ईडीची रेड का पडली?
ED raid ; मंत्र्यांना मोठा धक्का ! नातेवाईकावर ईडीची मोठी कारवाई,
असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले.पुढे ते ठाण्यात कार्यकारी अभियंता म्हणून जाणार होते, हे देखील यामध्ये महत्त्वाचं आहे. शिवसेनेच्या जवळच्या लोकांना मिळणाऱ्या पदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी म्हटलं की सध्या राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे आणि ही परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे.