Breaking

Pyare Khan : उर्दू शाळांमधील गैरकारभाराला बसणार चाप

Minority Commission action on maladministration in Urdu schools: अल्पसंख्यांक आयोगाची धडक कारवाई, गुन्हे दाखल

Akola महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोला जिल्ह्यातील शासन अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या. तेथील गंभीर गैरकारभार उघडकीस आणला. पातूर येथील अलहाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेतील महिला शिक्षकांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाळा संचालकावर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

शाळेचे संचालक सय्यद कमरुद्दीन यांनी बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिला शिक्षकांनी केला. शिक्षक नियुक्तीसाठी 40 लाख रुपयांची मागणी, वेतनातून 30-40% जबरदस्तीने कपात आणि सेवानिवृत्ती वेतनातून मोठी रक्कम वसूल करणे असे गंभीर आरोप शिक्षकांनी केले आहेत.

Adv. Prakash Ambedkar : आंबेडकर म्हणाले, राज्यघटनेनुसार कारभार चालला तर…

सय्यद कमरुद्दीन यांच्यावर 376 (बलात्कार)सह 45 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना हद्दपार करण्यात आले असून, त्यांच्यावर मकोका व एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार असल्याचे प्यारे जिया खान यांनी स्पष्ट केले.

अकोला जिल्ह्यात सय्यद कमरुद्दीन यांच्या 22 अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर अत्याचार, मारहाण आणि आर्थिक शोषणाचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून टाकण्याचे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाने दिले आहेत.

राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये गैरव्यवहार आणि सरकारला कोट्यवधींचा चुना लावला जात असल्याचा आरोप प्यारे जिया खान यांनी केला आहे. अल्पसंख्यांक समाजातील जागरूक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पीडित शिक्षकांनी तक्रारी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Demand of Vidarbh State : विदर्भ राज्यासाठी पुन्हा एल्गार!

अल्पसंख्यांक आयोगाच्या आदेशानुसार अकोला पोलिसांनी या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले आहे.