Breaking

Questions for cotton growers : CCI ची भलती अट; मग त्यांनी कापूस विकावा कुणाला ?

 

Farmers are suffering financial loss : 12 क्विंटलपेक्षा जादा कापूस पिकवणाऱ्यांपुढे प्रश्न

Wardha केंद्राची सीसीआय CCI अनेक जाचक अटी घालून शेतकऱ्यांचा कापूस विकत घेत आहेत. सीसीआय शेतकऱ्यांचा प्रति एकर 12 क्विंटल याच हिशेबाने कापूस विकत घेते, अशी अट आहे. मात्र, यापेक्षा अधिक कापूस पिकविला, तर तो व्यापाऱ्याला कमी भावात विकावा लागतो. यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

जवळपास 90 टक्के शेतकरी कापसाचे उत्पन्न एकरी 2 ते 12 क्विंटलपर्यंत घेतात. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, 10 टक्के शेतकरी असेही आहे की ते नवनवीन प्रयोग करून एकरी 15 ते 20 क्विंटल कापूस पिकवितात. भारतीय कापूस निगम कापूस खरेदी करताना एकरी 12 क्विंटल कापूस विकत घेते. त्यापेक्षा अधिकचा कापूस विकत घेत नाही. सातबारानुसार प्रति एकर 12 क्विंटलपेक्षा थोडाही अधिक कापूस असेल, तर शेतकऱ्यांना तो कापूस घरी न्यावा लागतो.

Collector of Nagpur : जिल्हाधिकारीच तळ ठोकून बसणार !

अधिकचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा तोटा करून विकावा लागतो. ही बाब प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ठरत आहे. एकीकडे शासन उत्पादन वाढवून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. प्रगत शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. त्याचवेळी त्याचे वाढीव उत्पादन हमी भावाने विकत घेताना जाचक अटींचा वापर करते. त्यांची आर्थिक अडवणूक करीत आहे.

Amravati Municipal Corporation: आमदारांनी गाठली महानगरपालिका !

शेतमाल खरेदी करताना मधातच ग्रेड कमी केली जाते. भाव कमी केले जातात. खूप आवक झाली असे कारण पुढे करून खरेदी बंद करणे, अशा जाचक अटी लावतात. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व कापूस भारतीय कापूस निगमने खरेदी करावा, अशा सूचना निगमला द्याव्यात, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.