Spreading Discord Over Reservation Is Sharad Pawar’s Sin : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप
Buldhana “मराठा आरक्षणाचा प्रश्न आज जळत आहे, कारण १९९४ साली मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी तो निकाली काढला नाही. त्यावेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर आज समाजात दुही, संघर्ष आणि गोंधळ निर्माण झाला नसता. ही सामाजिक फूट आणि विषमतेचे पाप शरद पवारांचेच आहे,” असा थेट आरोप जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी बुलढाणा दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत केला.
विखे पाटील म्हणाले की, “ओबीसींना आरक्षण मिळाले, तेव्हा मराठा समाजाने विरोध केला नाही, मोर्चे काढले नाहीत. उलट समाजातील सर्व घटकांनी ते स्वीकारले. परंतु आता काही जण राजकीय स्कोअरिंगसाठी या विषयावर समाजात भेद निर्माण करत आहेत.”
Local Body Elections : नाराज नगरसेवकांचा भाजपकडे कल; ‘तिसरी आघाडी’ विस्कटण्याच्या मार्गावर
ते पुढे म्हणाले, “१९९४ साली मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आजचा गोंधळ निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या नावाखाली समाजात विषमता वाढविण्याचे पाप त्यांच्याच खात्यावर आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी हा प्रश्न पवारांनाच विचारावा.”
पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी संजय राऊतांवरही जोरदार प्रहार केला. “राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. सकाळ झाली की कोंबडा बांग देतो, तसेच बांग देण्याचे काम पक्षाने त्यांना दिले आहे,” असा टोला विखे पाटील यांनी लगावला.
विखे पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महायुती सरकारची भूमिका काल होती तशीच आजही आहे.”
Arvind Sawant : ओला दुष्काळ जाहीर करा, ठाकरे गटाचा जिल्हा कचेरीत ठिय्या!
“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण प्रक्रिया सुरू आहे. सध्याची परिस्थिती केवळ गैरसमजांवर आधारित आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.