Breaking

Raghuvanshi Murder Case : सोनमच्या लग्नात ढसाढसा रडला होता नोकर!

Sonam had promised servant Raj to continue the relationship after marriage : लग्नानंतरही संबंध कायम ठेवण्याचं दिलं होतं वचन

Indore : सोनम रघुवंशीच्या लग्नात प्रियकर राज कुशवाहा पण उपस्थित होता. ती लग्नासाठी उभी राहिली तेव्हा तो स्टेजवरच सगळ्यांसमोर धाय मोकलून रडला होता. घटनेनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एवढेच नाही तर मी राजाशी लग्न करत असले तरीही ‘आयुष्यभर तुझीच राहीन’ असं वचन तिने नोकराला दिलं होतं.

इंदूरहून मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यातील पती राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येची सूत्रधार खुद्द त्याची पत्नी सोनम रघुवंशी असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी सोनम सह चार जणांना अटक केली आहे.

Raja Raghuvanshi murder case : ‘सोनम’ बेवफा! ‘राजा’सोबत हनिमूनला गेली; जीव अडकला नोकरामध्ये!

अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये इंदूरचा रहिवासी आणि सोनमचा प्रियकर राज कुशवाह, तसेच विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांचा समावेश आहे. 2 जून रोजी मेघालयमध्ये राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर सात दिवसांनी, सोमवारी सोनम गाजीपूरमधील एका ढाब्यावर अस्वस्थ अवस्थेत सापडली होती.

Raja Raghuvanshi Murder : हनिमूनला गेल्यावर नववधूनेच रचला नवऱ्याच्या हत्येचा कट!

सोनमने राजाची हत्या करण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत आणि नोकरीचे आमिष दिलं होतं. असे तपासादरम्यान उघडकीस आले आहे, हे आमिष स्वीकारूनच त्यांनी खून करण्याचे कट कारस्थान रचले आणि त्याची अंमलबजावणी केली. तर सोनम रघुवंशीच्या लग्नात तिचा प्रियकर राज कुशवाह देखील उपस्थित होता, अशी माहिती समोर येत आहे.