Congress burn Manusmriti : मनुस्मृतीने असमानता रुजवली, संविधानाने समानतेची मशाल पेटवली- राहुल बोंद्रे
Chikhali विजयादशमी आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने चिखली शहरात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान पूजन व मनुस्मृती दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी “संविधान हे लोकशाहीचा आत्मा असून, मनुस्मृतीने समाजात विषमता, जातिभेद आणि स्त्रीद्वेष रुजवला; तर संविधानाने समानतेचा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन केले.
नगरपरिषदेच्या समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाचे पूजन, प्रास्ताविकेचे वाचन आणि मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
Adv. Prakash Ambedkar : भाजप-संघाने ओबीसींचा विश्वासघात केला
“संविधान हे आपले मार्गदर्शक शास्त्र आहे. डॉ. आंबेडकरांनी सर्वांसाठी समानतेचा दीप प्रज्वलित केला, तो आजही लोकशाहीचा आधार आहे,” असे बोंद्रे यांनी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान खासदार राहुल गांधींना मिळालेल्या धमकीचा काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “भाजप नेतृत्वाने या घटनेबद्दल सार्वजनिक माफी मागावी,” अशी मागणी जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांनी केली.
“नाथुराम कितीही व्हेंटिलेटरवर जगवण्याचा प्रयत्न केला, तरी तो जगत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.
कार्यक्रमास तालुकाध्यक्ष राम जाधव, शहराध्यक्ष राहुल सवडतकर, डॉ. मो. इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, प्राचार्य नीलेश गावंडे, प्रा. राजू गवई, डॉ. संतोष वानखेडे, तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी “संविधान जिंदाबाद”, “मनुस्मृतीचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
Cyclone Shakti : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठा धोका!
काँग्रेसने या उपक्रमातून समानता, सामाजिक न्याय आणि संविधान रक्षणाचा संदेश देत समाजात पुन्हा एकदा “संविधान विरुद्ध मनुस्मृती” या विचारसरणीच्या संघर्षाला अधोरेखित केले आहे.