Rahul Gandhi’s mission is to win Gujarat, assembly elections : अनेक नेते भाजपमध्ये गेल्याने समर्थ नेतृत्वाचा प्रश्न
Mumbai ः पुढील वर्षी गुजरातमध्ये असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरूवात केली आहे. राहुल गांधी तब्बल दोन दिवस गुजरातमध्ये ठाण मांडून राहणार आहेत. ते ब्लॉक कार्यकर्त्यांपासून तर प्रदेशाध्यक्षपर्यंत सर्वांशी चर्चा करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसची स्थिती न सुधारल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रामुख्याने हा दौरा आहे. दोन वर्षांनंतर गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ एकच जागा गुजरातमध्ये मिळविली आहे.
२०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही खासदार निवडून आला नव्हता. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला फारसे चांगले यश मिळविता आले नाही. ६५ नगरपालिकांपैकी केवळ एकच नगरपालिका काँग्रेसला ताब्यात घेता आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ २६ आमदार निवडून आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ७७ आमदार निवडून आले होते. परंतु त्यापैकी अनेकांनी भाजपचा रस्ता पकडला आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार
अनेक नेते भाजपमध्ये गेल्याने काँग्रेससमोर समर्थ नेतृत्वाचासुद्धा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधीत पक्षनेते राहुल गांधी दोन दिवसांच्या गुजरात दौर्यावर गेले आहेत. अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी आज (७ मार्च) रोजी गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे सर्व माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. राजकीय व्यवहार समितीच्या सदस्यांशीही राहुल गांधी चर्चा करणार आहेत. याबरोबर गुजरातमधील सर्व जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षांशी थेट ते चर्चा करतील.
Rahul Bondre : विस्तापितांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने सोडवा
उद्या (८ मार्च) राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी चर्चा करणार आहेत. दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. गुजरात विधानसभा निवडणूक आपण जिंकू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.