Rahul Narvekar : विस्तार होणार, पण विधानभवनाच्या ‘हेरिटेज लूक’ला धक्का नाही

The ‘heritage look’ of the Vidhan Bhavan will be maintained : विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची स्पष्टोक्ती;

Nagpur नागपुरातील विधानभवनाचा विस्तार होणार म्हणजे त्याचा हेरिटेज लुकही जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हेरिटेज लुकला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यांनी नागपूरला येऊन कामांचा आढावा घेतला.

नागपुरातील विधानभवनाच्या विस्तारीकरणाला गती मिळाली आहे. इमारतीचे बांधकाम व जमीन अधिग्रहणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा नार्वेकर नागपुरात होते. त्यावेळी यांनी विधानभवन परिसरात संग्रहालय बांधण्याची इच्छा व्यक्त केली आणि या संदर्भात पुढाकार घेण्याचे निर्देश दिले.

R. R. Patil Sundar Gram Puraskar Scheme : आर.आर. पाटलांच्या नावाचा पुरस्कार सरकारने बंद केला?

नार्वेकर यांनी यावेळी सांगितले की, राजस्थान विधान मंडळ परिसरात एक संग्रहालय तयार करण्यात आले आहे. नागपूर विधानभवन परिसरातही त्याच धर्तीवर संग्रहालय बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच एफएसआय आणि पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विधिमंडळाची हेरिटेज इमारत कायम ठेवून हेरिटेज वास्तुव्यतिरिक्त उपलब्ध जागेच्या प्रस्तावित बांधकामाची माहिती सादर करण्यात यावी.’

विधिमंडळ परिसरात प्रस्तावित बांधकाम करताना पुरेशा प्रमाणात झाडे लावून पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात यावा. रस्ते मोठे व प्रशस्त असावेत. मुंबईतील पावसाळी अधिवेशनापूर्वी २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी यावेळी दिले.

बैठकीनंतर नार्वेकर यांनी विधिमंडळाची दोन्ही सभागृहे, मंत्रिदालनांसह विधिमंडळ परिसराची पाहणी केली. विधानभवन परिसरात विधानसभेत ५०० आणि विधान परिषद सभागृहात ३०० आसन व्यवस्था प्रस्तावित आहे. यासोबतच, एक मध्यवर्ती सभागृहदेखील बांधले जाईल. पक्षाची कार्यालये आणि इतर विभागदेखील बांधले जातील.

Pravin Datake : भाजपच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

या कामासाठी शासकीय मुद्रणालयाच्या १६१८२ चौरस मीटर जागेतून ९६७० चौरस मीटर जमीन विधिमंडळ सचिवालयाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात नार्वेकर यांनी इमारतींचे बांधकाम आणि भूसंपादनाचाही आढावा घेतला.