Raid on moneylenders : सरकारचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले!

 

 

Doubt of political influence : राजकीय आशीर्वादाने कारभार सुरू असल्याचा संशय

अवैध सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरी सहकार विभागाने छापे टाकून व्यवहाराची 46 महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली. अमरावती Amravati जिल्ह्यातील अचलपूर Achalpur शहरात दोन ठिकाणी ही कारवाई झाल्याने अवैध सावकारांचे धाबेदणाणले आहेत. सहकार विभागाच्या स्वतंत्र दोन पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे अचलपूर शहरातील दोन ठिकाणी अवैध सावकारीच्या व्यवसायासंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यानी दोन स्वतंत्र पथक गठित करून कारवाई केली. कांडली येथील राजकुमार गुळधे यांच्या निवासस्थानी साहाय्यक निबंधक के. एस. बलिंगे यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकला. या कारवाईत करारनामे, कोरे धनादेश व इतर असे 13 दस्तऐवज जप्त करण्यात आलेत. तर, दुसरी कारवाई अचलपूरातील जुना सराफा येथील रमेश गुलाबचंद तांबी यांच्या निवासस्थानी करण्यात आली. या कारवाईत कोरे धनादेश, करारनामे व इतर कागदपत्रे असे 33 दस्तऐवज जप्त करण्यात आलेत.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बेकायदा सावकारीचा व्यवसाय सुरु आहे. वास्तविक पाहता जिल्हा उपनिबंधकांकडून (डीडीआर) रितसर परवाना घेतलेल्यांनाच सावकारीचा म्हणजे नियमानुसार अल्प दराने बँकेच्या दरात व्याजाने पैसे देण्याचा अधिकार आहे. सरकारच्या प्रचलित व्याजदरानुसारच कर्ज देण्याचे निर्बंध त्यांच्यावर आहेत. बिगरशेती तारणी कर्ज वार्षिक 15 टक्के तर विनातारण कर्ज वार्षिक 18 टक्के व्याजदराने द्यावे, असे निकष आहेत. शेतीसाठी तारणी कर्ज वार्षिक नऊ टक्के तर विनातारण कर्ज 12 टक्क्यांनी देण्याची अट आहे. काहीजण प्रामाणिकपणे अटीचे पालन करतात. पण, काही लोक त्याचे पालन करीत नाहीत.

राजकीय आशीर्वादामुळे सावकारांची मनमानी

अनेक अवैध सावकार हे व्याजदरात मनमानी करतात. काही वर्षातच मुद्दलाच्या दुप्पट व्याजाची रक्कम होते आणि तेवढे पैसे एकाचवेळी देणे अशक्य झाल्याने अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, यातील अनेक सावकारांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने त्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. पोलिस धनाढ्याविरूद्ध तक्रार दाखल करून घेण्यास धजावत नसल्याचाही आरोप होत आहे.