Huge response from candidates for 64,000 posts : 64 हजार पदांसाठी उमेदवारांचा तुफान प्रतिसाद
i
New Delhi : देशातील बेरोजगारीचे भीषण चित्र पुन्हा समोर आले आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ साली रेल्वेच्या ६४,१९७ पदांसाठी तब्बल १.८७ कोटी अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली.
मंत्रालयाने सांगितले की, गेल्या चार-पाच वर्षांत रेल्वे नोकरभरतीवरील दबाव लक्षणीय वाढला आहे. अनेक कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, त्याचबरोबर रेल्वेचे जाळे वाढत असून आधुनिकीकरणाची गतीही वाढली आहे. यामुळे नव्या पदांची निर्मिती होत आहे तर काही जुनी पदे कालबाह्य होत आहेत. नवीन सुरक्षा प्रणाली, विद्युतीकरण प्रकल्प, यांत्रिकीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे भरतीची आवश्यकता अधिक वाढली आहे.
Bungalow dispute : आलिशान घरे पण बंगला न सोडल्याने मुंडे पुन्हा वादात !
सध्या रेल्वेत १.०८ लाख पदांसाठी भरती सुरू असून, त्यापैकी ९२,११६ पदांची जाहिरात २०२४ मध्येच काढण्यात आली आहे. यात असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, आरपीएफ कर्मचारी, कनिष्ठ अभियंते, पॅरामेडिकल कर्मचारी आणि नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एनटीपीसी या पदांचा समावेश आहे.
Jaya Vs Kangana : अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहात, लाज बाळगा !
यापैकी आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ४५,३०,२८८ अर्ज आले, जे विक्रमी आहेत. इतर पदांसाठी सरासरी १,०७६ अर्ज आले तर तांत्रिक पदांसाठीही मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.या आकडेवारीवरून रेल्वेतील भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच देशातील रोजगारासाठीची तीव्र स्पर्धा अधोरेखित झाली आहे.
______