Rain alert : अस्मानी संकट आणखी गडद होण्याची शक्यता :

Heavy rain warning again for the weekend : आठवडाअखेर पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत हवामान विभागाने आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भाचा दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. विशेषतः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Heavy rains havoc :अतिवृष्टीचा कहर महामार्ग बंद, रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होईल, असे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले. सध्या राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र, २६ सप्टेंबरपासून त्याचा प्रभाव वाढून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची तीव्रता वाढेल. २८ सप्टेंबर रोजी राज्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर टिकून राहील. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत आधीच अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यातच पुढील काही दिवसांतील पावसाचा इशारा मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

RPI Ramdas Athavle : रिपाइं (आठवले)च्या बैठकीत खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या!

दरम्यान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा रंगत आहे. यासाठी गावच्या पीक आणेवारी समित्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत. जर सलग पावसामुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले असल्याचे निष्पन्न झाले आणि पीक आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली, तरच संबंधित भागात ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.