Rain alert : नवरात्रीत मुसळधार पाऊस: पुढील 24 तास महत्त्वाचे

With heavy rains and gusty winds, alert for 36 districts : कुठे मुसळधार तर कुठे वादळी वाऱ्यासह, 36 जिल्ह्यांना अलर्ट

Mumbai : महाराष्ट्रात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील 36 जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसोबत जिल्हा नियोजन बैठकीत घुसू, शिवसेनेचा इशारा

राज्यातील उर्वरित 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत हवामान ढगाळ राहणार असून, अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात.

सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील. काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळतील, तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर रायगड आणि रत्नागिरी येथे मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होऊ शकतो. पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांत विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकीचा कलगितुरा रंगणार!

पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन आणि खरीप पिके या मुसळधार पावसामुळे बाधित झाली आहेत. अनेक नद्यांना पूर आला असून, ग्रामीण भागातील दळणवळणाची साधने विस्कळीत झाली आहेत.\

हवामान विभागाने दिलेला यलो आणि ऑरेंज अलर्ट लक्षात घेता, पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.