Breaking

Raj Thackeray-Devendra Fadnavis : भावांच्या मनोमिलनाच्या चर्चेत राज ठाकरे, फडणवीस यांचे ‘मिलन’

Party workers fear ‘twist’ on the path to unification
: एकत्रीकरणाच्या वाटेवर ‘टि्वस्ट’ ची कार्यकर्त्यांना भीती

Mumbai : उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधूचे मनोमिलन आणि एकत्रीकरणाच्या चर्चा काही दिवसापासून चांगल्या आहेत यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी मोठा ‘टि्वस्ट’ पाहायला मिळतोकी काय अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा सगळ्या प्रकारच्या स्थानिक आणि ग्रामीण भागातील राजकारणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला संघटनात्मक बांधणी मजबूत करता येते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात प्रतिषेची आहे.

Sanjay Raut : महापालिका जिंकण्यासाठी वॉर्ड फोडले जातील

या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे, हे एकमेव कारण नाही, यंदाची निवडणूक एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची आहे. उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मनसे आणि उद्धव ठाकरे गट या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळत आहेत. वरिष्ठ स्तरावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटात काय बोलणी सुरू आहे यावर तर्क वितर्क सुरू आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

Harshvardhan sapkal: विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

दोन्ही ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना, मुंबईत एक मोठी घडामोड घडतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रयाच्या ताज ताज लॅंड एन्ड हॉटेलमध्ये पोहोचले तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. दोन्ही नेते या ठिकाणी भेटतील अशी शक्यता आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यास ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीच्या शक्यतेवर त्याचा काय परिणाम होणार? यात काही ‘टि्वस्ट’ समोर येईल का अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. यातच या भेटीवर उद्धव ठाकरे कसे व्यक्त होणार. याबद्दलही उत्सुकता असल्याचे सांगितले जात आहे.