Others’ ‘dissatidfied’ reactions to Raj, CM’s visit: राज, मुख्यमंत्री भेटीवर इतरांच्या ‘नाराजी’च्या प्रतिक्रिया
Mumbai : राज ठाकरे यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे गटात सोबतच इतरांनी थोड्याशा नाराजीच्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे समोर येत आहे. सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर तसेच रोहित पवार यांनी यांनी नाराजीच्या सुरात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं, ‘महाराष्ट्राच्या हितापेक्षा त्यांचा इगो मोठा नाही’. त्यानंतर माझ्या पक्षाने, माझ्या प्रमुखांनी सकारात्मकता दाखवली. त्यासाठी आवश्यक असणारी कृती करणारी पावलं उचलली. आता मनसे प्रमुखांच्या मनात काय आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. मनसे प्रमुखांनी मौन साधलेलं आहे.
Raj Thackeray-Devendra Fadnavis : भावांच्या मनोमिलनाच्या चर्चेत राज ठाकरे, फडणवीस यांचे ‘मिलन’
मनसे प्रमुखांची आज मुख्यमंत्र्यांशी कुठल्या कारणासाठी भेट झाली, ते आपल्याला माहित नाही. त्यांनी कोणाला भेटावं, हा त्यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला बांधिल नाहीत. ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, त्याला अनुसरून निर्णय घ्यायच कि, महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या आणि गुजरातधार्जिणं धोरण अवलंबणाऱ्या फडणवीसांच्या हिताचा घ्यायचा, हा निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे असे ही सुष्मा अंधारे यांनी स्पष्ट केले.
आताच्या भेटीवर घाईमध्ये काहीही बोलणं उचित होणार नाही. राज साहेबांच, उद्धव साहेबांच एकत्रित येणं हे त्यांच्यापुरता मर्यादीत राहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या तरुणपिढीला, महाराष्ट्रात केलेल्या सर्वेमध्ये 88 टक्के लोकांना वाटतं की, त्यांनी एकत्र यावं असं मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. राजठाकरे असे कोणाला भेटत असतील, तर ते त्याच कामासाठी भेटले असतील असं का म्हणायचं? विश्वासहर्ता दोन्ही पक्षांनी पाळली पाहिजे. आता घाईत बोलण उचित होणार नाही. जे काही आहे ते लोकांसमोर येईल असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
Pratap Sarnaik : ग्रुप बुकींगवर पंढरपूर साठी राज्यभरातून थेट बस मिळणार
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येतील असा वातावरण जेव्हा निर्माण झालं होतं, त्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा आत्मीयतेची भावना निर्माण झाली होती. ठाकरे कुटुंबात मोठ्या प्रमाणात कटूता होती. बीजेपी सोबत राज ठाकरे भेटत असतील तर या वातावरणाच्या फायदा मनसेने भाजप सोबत वाटाघाटीसाठी केला का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होईल. राज ठाकरेंच नाव कुठेतरी खराब होऊ शकते असं सर्वसामान्य माणसाला वाटते असं रोहित पवार म्हणाले.