Raj Thackeray strongly criticizes the central and state governments :राज ठाकरे यांची केंद्र, राज्य सरकारवर जोरदार टीका
Panvel : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठी माणसाच्या अधिकार, रोजगार, भूमी आणि अस्मितेच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला लक्ष केले. राज ठाकरे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही गुजरातचे असून, त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातकडे वळले.
डायमंड मार्केटसारखे उद्योग गुजरातमध्ये गेले. “प्रत्येकाला आपल्या राज्याविषयी प्रेम असते, मग आम्ही बोललो तर आम्हाला संकुचित कसे म्हणता?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री शाळांमध्ये लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, पण कामासाठी महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी शिकवण्याचा विचार का करत नाहीत?, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. “मुख्यमंत्र्यांकडून भूमिपुत्रांचा विचार केला जात नाही,” असे ते म्हणाले.
Education officials arrested : शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेविरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार
रायगड जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आणि बाहेरून मनुष्यबळ येत आहे, त्यामुळे मराठी तरुण बेरोजगार राहत आहेत. रायगडची जबाबदारी जयंतराव पाटील यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गुजरातमध्ये अल्पेश ठाकूरने 20 हजार बिहारी लोकांना हाकलले, आणि भाजपने त्याला आमदार केले. त्याची बातमी कुठेही आली नाही, पण मी महाराष्ट्रासाठी बोललो तर मला संकुचित म्हटलं जातं, असे म्हणत त्यांनी डबल स्टँडर्डचा आरोप केला.
Uddhav Balasaheb Thackeray : बुलढाण्याचे उद्योजक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत!
महायुती सरकारच्या जनसुरक्षा कायद्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. सरकारी प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवले जाईल. सरकार ने एकदा अटक करून दाखवो. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाची आठवण सांगताना त्यांनी नमूद केलं की, श्रीपाद अमृत डांगे या कम्युनिस्ट नेत्यांनी त्या वेळी शिवसेनेच्या व्यासपीठावर भगवा स्वीकारला होता,
Revenue Department : 13 हजार प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहिम
आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज एकत्र आले आहेत, अशी टिप्पणी करत त्यांनी राजकीय मतभेदांवर भाष्य केले. या भाषणातून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आणत, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना थेट सवाल केले आहेत.
_____