Breaking

Raj Thackeray : …तर काढला जाऊ शकतो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा !

UNESCO grants World Heritage Site status to Shivaji Maharaj’s forts, MNS reacts : युनोस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरू नका

Mumbai : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. यासाठी २० पैकी सर्वच्या सर्व २० देशांनी यावर एकमत दिले आहे. यामुळे फक्त महाराष्ट्रातच, देशातच नव्हे जगभरात आनंद साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासाठी आनंद व्यक्त केला आहे. सोबतच त्यांनी राज्य सरकारचे कानही टोचले आहेत. युनेस्को या संस्थेला हलक्यात घेऊ नका. कारण त्यांचे निकष पाळले नाही तर हा दर्जा काढला जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यासंदर्भात राज ठाकरे यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामीळनाडूमधला आहे. या निमित्ताने महाराजांनी स्वराज्याचा विचार कुठवर पोहोचवला होता, हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतीचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे, हे पण कळेल.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांनी दिल्या बल्लारशाह जीआरपी पोलिस स्टेशन निर्माण करण्याच्या सुचना !

या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील ११ किल्ल्लांचं किमान नीट संवर्धन होईल, अशी अपेक्षा. एकदा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तुचं संवर्धन नुतनीकरण याचे खूप कडक निकष असतात ते पाळावे लागतील. पण त्यामुळे किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील. आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्यानेदेखील उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा.

Liquor tax hike : दारूची दरवाढ, शेतकऱ्यांप्रमाणे आता रेस्टॉरेंट-परमिट रूमवाल्यांच्या आत्महत्या सुरू होतील ?

आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दूरवस्था करून ठेवली होती. त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे. आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती, ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो. आम्ही हे गेली अनेक वर्ष म्हणत आलो आहे की महाराजांनी उभारलेले किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी याचं नीट जतन केलं आणि तिथे पर्यटनासाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठच्या कुठे निघून जाईल.

Eknath Shinde : पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. बेशिस्तपणा खपवून घेणार नाही !

फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं. याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत. पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमानमधील अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं.. जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला. पण निकष न पाळल्याने तो २००९ साली काढून घेतला. त्यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये. तर एका मोठ्या जबाबदारीचं भानदेखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहे, ती तात्काळ पाडून टाका. त्याच जात – धर्म पाहण्याची गरज नाही.’