Raj Thackeray breather! ‘Oh come on, why you staring at me with eyes : राज ठाकरेंनी दिला दम ! ‘अरे ये रे, तू काय डोळे वटारून बघतोस ‘
Mumbai: ‘ माझा ट्रेलर मी लाँच केला, पिक्चर अभी बाकी है’ हे उद्गार आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे. एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या वातावरणाचा संदर्भ देत हे विधान केले आहे. याच कार्यक्रमात त्यांनी ‘ अरे.. ये… रे.. तू काय माझ्याकडे डोळे मटारून काय बघतोस?’ असा दम दिला त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच गाजत आहे. त्यांनी एका कलाकाराला स्टेजवर बोलवण्यासाठी हा शब्द प्रयोग केला. पण तेवढाच व्हिडिओ व्हायरल होत असून तो कोणासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमधील राज ठाकरे यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. गेल्या काही दिवसांंपासून हिंदी सक्ती विरोधात मनसेने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे सह मराठीसाठी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. ‘पुन्हा असे निर्णय खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त ताकीद’ त्यांनी सरकारला दिली.
धान्य विक्री करणाऱ्यांची शिधापत्रिका होणार रद्द, खरेदीदारांवरही कारवाईचा इशारा
दरम्यान राज ठाकरे यांनी ‘ये रे ये रे पैसा 3’ या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली. तिथे त्यांनी हे विधान केले त्यांचा कार्यक्रमातीलएक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एका मराठी कलाकाराला स्टेजवर बोलवताना ‘माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोस’, असं म्हणताना दिसत आहेत. आता त्यांचा एवढाच व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आणि हा कोणाला इशारा आहे. हा प्रश्न निर्माण केला जात आहे. राज ठाकरे यांनी ट्रेलरचे कौतुक करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
Vikas thakare: विकास ठाकरेंची मागणी, पश्चिम नागपूरच्या झोपडपट्ट्यांचे पट्टे वाटप तत्काळ करा
सरकारने हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द केला, तरी राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, ‘ पुन्हा असे निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत.’ त्यांच्या या वक्तव्याने जन भावना अधिकच पेटल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ट्रेलर लाँच सोहळ्यात राज ठाकरे यांनी एक सूचक विधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, ‘पिक्चर अभी बाकी है.’या वाक्यातून त्यांनी केवळ चित्रपटाचा नव्हे, तर मराठी भाषेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात स आहे. हा संघर्ष अजून संपलेला नाही आणि यात आणखी टप्पे येणार आहेत, असा संदेश राज ठाकरे यांनी दिल्याचा कैलास बांधण्यात येत आहे.