Raja Raghuvanshi murder case : ‘सोनम’ बेवफा! ‘राजा’सोबत हनिमूनला गेली; जीव अडकला नोकरामध्ये!

 

Sonam Raghuvanshi had an affair with a five years younger servant : इंदौरच्या रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; पाच वर्षांनी लहान आहे नोकर

Indore : हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगमध्ये गेलेले इंदूरचे जोडपे गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. राजच्या खुनानंतर वाढलेले गूढ कमी झाले पण या हत्याकांडात नवा ट्विस्ट समोर आला आहे. हनिमूनला राज सोबत गेलेल्या सोनमचा जीव आधी पासूनच 5 वर्षे लहान असलेल्या नोकरावर जडलेले होते हे उघड झाले आहे. त्याचेही नाव राज आहे, हे विशेष.

शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या जोडप्याबद्दल एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. सोमवारी पहाटे उत्तरप्रदेशातील गाझीपूरमधून पोलिसांनी सोनम रघुवंशीला अटक केली. यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशातून सोनमच्या तीन साथीदारांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता राजा रघुवंशी हत्याकांड सोनमचे नोकरासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.

Raja Raghuvanshi Murder : हनिमूनला गेल्यावर नववधूनेच रचला नवऱ्याच्या हत्येचा कट!

पोलिसांनी आतापर्यंत सोनमसह विशाल सिंग, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत अशा चौंघाना अटक केली आहे. चौघांकडे चौकशी केली असता सोनमची राज कुशवाह नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब समोर आली यातूनच सोनमने आपला प्रियकराला हाताशी धरून पती राजा रघुवंशीची हत्या केली. राजने या कटात विशाल, आनंद आणि आकाश अशा तीन मित्रांना देखील सामावून घेतलं. या सर्वांनी शिलाँगमध्ये राजाची हत्या केली. यानंतर त्यांनी राजाचा मृतदेह दरीत फेकून दिला.

सोनम आणि राजाचे लग्न ११ मे रोजी झालं होतं. लग्नानंतर अवघ्या सहाच दिवसात सोनमने प्रियकर राजसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला. राजने त्याचे मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांनाही कटात सहभागी करून घेतली. प्लॅननुसार त्यांना गुवाहाटीला पाठवले. राज कुशवाह हा सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.

Jalindar supekar news: जालिंदर सुपेकरांवर 550 कोटींची लाच मागितल्याचा तक्रारी

मिळालेल्या माहितीनुसार, सोनमचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. याच दुकानात राज कुशवाह बिलिंग एजंट म्हणून काम करतो. दुकानात बिलिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या राजवर सोनमला प्रेम झालं. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध सुरु होते. दरम्यान, सोनमचा ११ मे रोजी राजासोबत विवाह झाला. यानंतर अवघ्या सहाच दिवसांत सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला.

Superintendent of Police Archit Chandak : “भाईगिरी बंद करा, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा!”

राजने त्याचे मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांना तयार केले आणि सर्वांना गुवाहाटीला पाठवलंजेव्हा सोनम आणि राजा शिलाँगला आले. तेव्हा ते तिघेही तिथे आले. त्यांनी एक बाईक भाड्याने घेतली. दोघांचा पाठलाग केला. प्लॅननुसार सोनमने राजाला डबल डेकर परिसरात नेले. तेथे सर्वांनी मिळून राजाची हत्या केली. पतीच्या हत्येनंतर सोनम नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. ती वाराणसीहून गोरखपूरला बसने गेली. पण १७ व्या दिवशी तिने घरी फोन करून आपण उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथं असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.