Rajendra Raut : तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटला, तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते?

Former MLA Rauts direct question to Rohit Pawar : माजी आमदार राऊत यांचा रोहित पवारांना थेट सवाल

Barshi : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. रोहित पवारांनी बार्शीतील एका गाडी जाळण्याच्या घटनेवरून अप्रत्यक्षपणे राऊत यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी थेट आरोप आणि खोचक टीका करत, रोहित पवारांना “गप्प बसणार नाही” असा इशारा दिला आहे.

“तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवता, पण स्वतःनं अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे. एमआयडीसीमध्ये काय लफडे केले, त्याचाही हिशेब द्या,” असं म्हणत राऊत यांनी रोहित पवारांच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते? एवढं गबाळ तुमच्याकडे आलं कुठून? ईडीच्या नोटीस का आल्या? कारखान्यांमध्ये काय व्यवहार झाले, याची उत्तरं आधी द्या,” असा प्रश्न विचारत त्यांनी पवार कुटुंबीयांवर थेट आरोप केले.

Sudhir Mungantiwar : लोकांचे प्रेम हेच खरे सेवाकार्याचे टॉनिक !

राजेंद्र राऊत म्हणाले, “खोटे आरोप केल्यास आम्ही गप्प बसणारे नाही. आम्हाला पण तोंड दिलंय. जर वैयक्तिक आरोप सुरू ठेवले, तर त्यांचं घराणं कुणाची घरं मोडून बसलंय, याची माहितीही माझ्याकडे आहे.” तसेच, “अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नका. आधी माहिती घ्या. आमची जहागिरी पाहण्याआधी तुमचे आजोबा काय करत होते, ते बघा,” अशा शब्दांतही त्यांनी रोहित पवारांवर टीका केली.

Dattatray Bharne : एखादं वाकडं काम करून परत सरळ केलं त्याची नोंद होते

यावेळी बोलताना राऊत यांनी आपल्या कुटुंबाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत सांगितले की, “शिवरायांच्या काळात आमच्या राऊत कुटुंबाला ही जमीन देण्यात आली होती. आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात घोडेस्वार होते.” मुलगा रणवीर राऊतवर करण्यात आलेल्या आरोपांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. “रणवीरचा या घटनेशी काही संबंध नाही. पूर्वी जी वादावादी झाली, ती एका महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीमुळे झाली होती,” असंही ते म्हणाले.