Nitin Gadkari is a role model for leaders of all parties : आजी-माजी मंत्र्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतीत सर्वपक्षीय नेत्यांचे मवाळ धोरण असते. संसदेत किंवा संसदेच्या बाहेर गडकरींबद्दल कुणीही वाईट बोलत नाही. उलट आमच्या मतदारसंघात किती छान काम केले, हेच सांगतात. नागपुरात काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमातही असाच अनुभव आला. त्यांनी तर देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांचे गडकरी हे Role Model असल्याचे सांगितले.
नागपूरजे माजी पालकमंत्री अनीस अहमद यांच्या शिक्षण संस्थेतर्फे एक कार्यक्रम शनिवारी (१५ मार्च) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि हिमाचल प्रदेशचे तंत्रशिक्षण मंत्री राजेश धर्माणी प्रमुख पाहुणे होते. यावेळी अनीस अहमद गडकरींबद्दल म्हणाले, ‘नितीन गडकरी कधीही भेदभाव करत नाहीत. मी राज्यात मंत्री असताना हज हाऊसचे काम केले. त्यावेळी माझ्यासोबत जवळचे लोकही नव्हते. पण गडकरींनी साथ दिली.’ गडकरींनी ज्या प्रमाणात नागपूरचा विकास केला आहे, तेवढा तर गुजरातचाही झालेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अनिस अहमद यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत वंचितमध्ये प्रवेश घेतला होता. पण उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी केंद्रावर पोहोचायला त्यांना दोन मिनिटे उशीर झाला. त्यामुळे ते रिंगणात उतरू शकले नाही. त्यानंतर काही दिवस होत नाही तोच, ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत.
Harshawardhan Sapkal : धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?
हिमाचलप्रदेशचे काँग्रेसचे मंत्री राजेश धर्माणी यांनी तर अख्खे भाषण गडकरींवरच दिले. मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये भाषण केले. गडकरींनी फक्त नागपुरात काम केले आहे असे नाही. तिबेट, लेह-लद्दाख, मनाली, देशात कुठेही गेलात तरी सगळीकडे गडकरींची कामं दिसतील. ते फक्त नागपूरचे नाही तर संपूर्ण देशाचे नेते आहेत. प्रत्येक मंत्री गडकरींसारखा असायला हवा. कोणत्याही पक्षाचा नेता असला तरीही तो गडकरींना आदर्श मानतो, असं धर्माणी म्हणाले