Breaking

Rajkumar Badole : विधानसभा उपाध्यक्षपदी राजकुमार बडोले?

 

Badole may be appointed as the Deputy Speaker of the Legislative Assembly : राष्ट्रवादीच्या दावाची शक्यता; बडोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Gondia विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद अध्यक्षपद भाजपाकडे गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे NCP Ajit Pawar विधानसभा उपाध्यक्षपद येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील DCM Ajit Pawar या पदासाठी आग्रही आहेत. राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

सामाजिक समतोल साधण्यासाठी तसेच एससी प्रवर्गाला न्याय देण्याच्या दृष्टीने उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राजकुमार बडोले यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule : दिव्यांगांच्या घरी १५ वर्षे वीज बील येणार नाही!

दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचे नाव दिले जाणार, याची देखील चर्चा सुरू आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गटाने दावा केला असून या पदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांचा सुद्धा पाठिंबा लागणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे.

Shyamkumar Barwe : काँग्रेसचे खासदार भाजपच्या प्रेमात?

महाविकास आघाडीकडून यासंदर्भात निर्णय झाला नसल्याचे समजते. पत्र दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षनेते पद देण्यासंदर्भात सकारात्मक आहेत का? हा सुद्धा प्रश्न आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गटाने दावा केला आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेता पद काँग्रेसला मिळायला हवे, असे म्हटले आहे.