Breaking

Rajkumar Patel : पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न; माजी आमदारपुत्राविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Attempted murder case filed against former MLA’s son : राजकुमार पटेलांसह ४०० जणांवर फौजदारी; मृतदेहाची अवहेलना केल्याचा आरोप

Amravati कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार राजकुमार पटेल यांचे पुत्र व धारणी बाजार समितीचे सभापती रोहित पटेल याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चिखलदरा पोलिसांनी राजकुमार पटेल, मन्ना दारसिंबे, सुनील उईके, रघुवीर सतवासे, गणेश बेठेकर, देविदास कोगे यांच्यासह ३०० ते ४०० जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

२९ जुलै रोजी चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी, ३० जुलै रोजी उत्तरीय तपासणी करून मृतदेह तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला.

Amol Mitkari : एकाच ऑटोत पंधरा मुलं? विद्यार्थ्यांच्या जीवाशी रोजच होतो खेळ!

मुलीच्या मूळ गावी गांगरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी, ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी करत, राजकुमार पटेल व रोहित पटेल यांनी मृतदेह धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

३१ जुलै रोजी, घटांग टी-पॉइंटवर आंदोलनकर्त्यांनी विनापरवानगी सार्वजनिक रस्ता अडवून मृतदेह रस्त्यावर ठेवला. “प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रवेश द्या; अन्यथा आम्ही प्रेतासह याठिकाणीच बसतो,” असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घालण्यात आली. यानंतर काही वेळात राजकुमार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह उचलून रोहित पटेलच्या वाहनात ठेवला आणि धारणीकडे निघाले.

Malegao case result : ‘हिंदू दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हला न्यायालयाची चपराक’

एफआयआरनुसार, रोहित पटेल याने कारने पोलिसांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी त्या वाहनाला रोरा फाट्यानजीक अडवून रोहित व राजकुमार पटेल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना चिखलदरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याच दिवशी, मृत मुलीवर गंगारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित पटेल याला गुन्ह्यात अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर राजकुमार पटेल यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.