Breaking

Raju Shetti : शेतकऱ्यांनी दबाव गट तयार करावा

Farmers should form pressure groups : माजी खासदार राजू शेट्टी यांचे आवाहन

Buldhana ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन, तूर, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या शेतमालाच्या योग्य भावासाठी शासनावर दबाव गट तयार करण्याची गरज आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

राजू शेट्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर एकत्रित आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला जात आहे. त्यांच्या विविध आंदोलनांमुळे त्यांच्यावर पोलिसांनी ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले होते. अशाच प्रकरणांमध्ये चिखली न्यायालयात सुनावणीसाठी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.

Majhi Vasundhara : नागपूर विभागातून आंजी ग्रामपंचायतने मारली बाजी

१८ फेब्रुवारी २०२५ रोजी चिखली दौऱ्यावर असताना, त्यांनी प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर चर्चा झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुढील आंदोलनाचे संकेत देण्यात आले.

Shivaji Maharaj Jayanti : ढोलताशा, आदिवासी नृत्यातून महाराजांना वंदन!

मागील काळातील पीक विम्याची थकबाकी त्वरित देण्याची मागणी. हमीभावासाठी सरकारला जाब विचारण्याचा निर्धार. सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा या पिकांचे भाव वाढवण्यासाठी शासनावर दबाव. शेतकऱ्यांची जनजागृती करून मोठ्या मोर्चाचे आयोजन, या मुख्य मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.