Raju Shetti : शेतकरी आत्महत्यांसाठी सरकारला लाज वाटली पाहिजे!

Raju Shetty said ministers will not be allowed to roam in rural areas : मंत्र्यांना ग्रामीण भागात फिरू देणार नाही

Akola : युती सरकार शेतकऱ्यांसोबत मोहम्मद तुघलकासारखे वागत आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा २० टक्के जादा अनुदान आणि शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास असमर्थ असल्याचे २८ मार्च रोजी कोल्हापुरात जाहीर केले. मग महायुती सरकारने असा जाहीरनामा काढलाच कशाला, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सरकारला लाज वाटली पाहिजे, असे परखड मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच, आम्ही युती सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला ग्रामीण भागात फिरू देणार नसल्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. चौथ्या शेतकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

Harshawardhan Sapkal : ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा!

शेतकरीही काही प्रमाणात जबाबदार..
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कुठे तरी कमी पडत आहेत का, असा प्रश्न विचारला असता शेट्टी म्हणाले, “शेतकरी हा जाती-धर्माच्या पलीकडे राहून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढला पाहिजे. सरकारच्या शेतकरीविरोधी आणि फसव्या धोरणांविरोधात ठाम भूमिका घ्यायला हवी. कार्पोरेट विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. जीएसटी, उत्पादन खर्चात वाढ, महागलेली रासायनिक खते आणि बियाणे यांकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळेच शेतकरीही काही प्रमाणात जबाबदार आहेत.”

“सरकार फसवे जाहीरनामे काढून शेतकऱ्यांची मते घेत आहे आणि त्यांची फसवणूक करत आहे. मूर्तिजापूर तालुक्यात आठवडाभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. याची सरकारला लाज वाटली पाहिजे”

Amgaon – Gondia : आमगावात फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी !

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाय..
या संदर्भात शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतो. पाच वर्षांपूर्वी सोयाबीनला ९,००० रुपये दर मिळत होता. त्यावेळी शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा स्वस्त होत्या. मात्र, आता खतांच्या आणि औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने उत्पन्न घटते आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जगण्यावर होतो. त्यामुळेच कुटुंबाच्या भविष्यासाठी शेतकरी आत्महत्या करण्यास मजबूर होतो. सध्या महाराष्ट्रात दिवसाला सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.