Rajya sabha election : मोठा ट्विस्ट शरद पवार बिनविरोध राज्यसभेत!

rajya-sabha-election-maharashtra-sharad-pawar-elected-unopposed-mva-bjp-support : मविआचे एकमत, भाजपचे सहकार्य; सातही जागा निर्विरोध

Mumbai : राज्यसभा निवडणूक 2026 मध्ये महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत आणि भाजपच्या सहकार्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेसाठी उमेदवारी बिनविरोध निश्चित झाली आहे. राज्यातील सातही जागांसाठीची निवडणूक आता निर्विरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. त्याचवेळी भाजपने पाचवा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने प्रमुख सात उमेदवारच रिंगणात राहणार आहेत. त्यामुळे वयाच्या ८५व्या वर्षी शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार असून त्यांच्या साठ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आणखी सहा वर्षांची भर पडणार आहे.

राजकीय वर्तुळात याबाबत आधीपासूनच चर्चा होती की, मविआत एकमत झाल्यास भाजप आक्रमक भूमिका घेणार नाही. ती अटकळ खरी ठरली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवारी असून सर्व उमेदवार त्याच दिवशी अर्ज दाखल करणार आहेत.

Sunetra pawar : 20 पेक्षा जास्त आमदारांची सुनेत्रा पवारांशी तातडीची बैठक

दरम्यान, भाजपने महाराष्ट्रातून चार उमेदवार जाहीर केले आहेत. विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना पक्षाने संधी दिली आहे. तावडे आणि आठवले यांना पुनश्च संधी देतानाच उर्वरित दोन नावांबाबत केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा अवलंब केल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत.

या निवडणुकीतील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे आजोबा-नातू एकाचवेळी राज्यसभेवर जाणार आहेत. शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबातील दोन पिढ्या एकत्र राज्यसभेत असण्याची दुर्मिळ घटना घडत आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने शरद पवार गटासमोर अजित पवार गटात विलीनीकरण न करण्याची अट ठेवली होती. ती अट मान्य करण्यात आल्यानंतरच पाठिंबा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विलीनीकरणाचा मुद्दा आता संपलेला आहे, असे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

Rajya sabha election : राज्यसभा रणधुमाळीत शरद पवारांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंचा डबल डाव?

राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होणे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना मानली जात आहे. संघर्षाच्या चर्चांदरम्यान अखेर सर्व पक्षांनी सामंजस्याचा मार्ग स्वीकारल्याने निवडणूक न होता थेट निवड होणार आहे.