Rajya sabha elections : माजी महापौर मायाताई इवनाते होणार खासदार, भाजपचे धक्कातंत्र

Ex-mayor-maya-iwnate-to-be-rajyasabha-candidate-for-BJP : महिनाभरापूर्वी महापालिका निवडणूक जिंकल्या, आता थेट राज्यसभेत

Nagpur भाजप राज्यसभेवर कोणाला पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याकरिता पक्षाच्यावतीने २५ उमेदवारांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली होती. यापैकी चार उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली आहे. आज चार उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली. यात नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते समावेस असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

विशेष म्हणजे मायाताई या महिनाभरापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जात आहे याची कल्पना मायाताईंना नव्हती. मात्र त्यांना काल भाजप कार्यालयातून कॉल करून ताबडतोब मुंबईला बोलावून घेतले होते. भाजपने त्यांना तुमचे नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचे सांगून त्यांना सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे विदर्भातून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होती. पूर्व विदर्भातूनही अनेकांनी इच्छा दर्शवली होती. यात गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांचा समावेश होता.

Rajyasabha election : शरद पवारांवरून पेच; उमेदवारी न दिल्यास भाजप पाचवा उमेदवार देणार?

भाजपने मायाताई इवनाते यांच्यासह विनोद तावडे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ती झाली नाही तरी भाजपकडे असलेले आमदारांच्या संख्याबळ लक्षात घेता चारही उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेचासुद्धा एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.

Shegao National health conference : आध्यात्मिक नगरी की राजकीय रणांगण? शेगावात महायुतीमध्ये शक्तीप्रद्रशनाची चढाओढ

महाविकास आघाडी एकत्र राहिली तर त्यांचाही एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. मायाताई यांना भाजपने महापौर केले होते. पंधरा वर्षापूर्वी महापौरपदाचे आरक्षण आदिवासी समाजासाठी निघाले होते. भाजपने हलबा समाजाचे देवराव उमरेडकर यांना महापौर केले होते. मात्र त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने महिनाभरातच मायाताई यांची लॉटरी लागली होती.