Allegations against Khadse family; Daughter in law in the field for Nathabhau : खडसे कुटुंबावर आरोप; नाथाभाऊंसाठी सून मैदानात
Jalgaon : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात खेवलकर यांना अटक झाल्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते खडसे यांच्यावर हल्लाबोल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खडसे कुटुंबावरील आरोपांवर केंद्रीय मंत्री आणि खडसेंच्या सुन रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून प्रांजल खेवलकर यांना अटक केली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. भाजप आमदारांनीदेखील काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन खडसे कुटुंबावर हल्लाबोल केला होता.
Mango village : सरपंचांच्या संकल्पनेतून अहेरअल्ली गावाची होणार आमराई !
जळगावात भाजपकडून झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना रक्षा खडसे म्हणाल्या, सध्या जे सुरू आहे, त्याच्या वेदना मलाही होतात. राजकारण कशा पद्धतीने चाललं आहे, हे सर्वांनाच दिसतंय. जिल्ह्यात या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात, असा त्यांचा इशारा होता.
रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं की, कोणताही नेता असो, त्याने विकासावर भर दिला पाहिजे. शेतकऱ्यांचे, विकासाचे अनेक मुद्दे आहेत. त्याकडे लक्ष दिलं तर जिल्ह्याचं भलं होईल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर टीका केली.
______