Sudhir Mungantiwar’s dream will definitely come true, Raksha Khadse is confident : शिस्त, टाईम मॅनेजमेंट शिकायचे असेल तर मैदानावर उतरा
Chandrapur : चंद्रपूर जिल्हा मागासलेला आहे आणि विकासाच्याबाबतीत खूप मागे आहे, असे चित्र रंगवण्यात आले होते. पण येथे आल्यावर कळले की, चंद्रपूर-गडचिरोली जिल्हे विकासाच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येथे अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले आहे, असे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या.
चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर येथे गोंडवाना विद्यापीठातर्फे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘सुधीरभाऊंनी येथे बोलावलं. त्यामुळेच या विभागाचं वैभव बघायला मिळालं. मी पहिल्यांदा येथे आले आणि विलक्षण आनंद झाला. चंद्रपूर गडचिरोलीचा जो विकास झाला, तो बघण्यासारखा आहे, कौतुक करण्यासारखा आहे.’
Rajiv Pratap Rudy : सुधीरजींसारखं काम करणारा नेता देशात दुर्मिळच
महाराष्ट्रभरातून विद्यार्थी येथे आलेले आहेत. हा भाग मागासलेला आहे, असे चित्र काहींनी निर्माण केले होते. ते खोटे आहे. मी केंद्रीय राज्य क्रीडामंत्री म्हणून देशभरात फिरते. काही राज्यांतील सुविधा बघून आपल्या राज्यात अश्या सुविधा का नाहीत, याची खंत वाटते. पण आज चंद्रपूर जिल्ह्यात आल्यावर ही खंत दूर झाली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केले आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्या नक्की पूर्ण करेन, असा शब्द रक्षा खडसे यांनी दिला.
इथे अधिक चांगलं सेंटर झालं पाहिजे. खेळाडुंना चांगले कोचिंग, चांगले प्रशिक्षक मिळाले पाहिजेत. जेणेकरून ‘ऑलम्पिक २०३६’ मध्ये महाराष्ट्रातून, विदर्भातून, चंद्रपुरातून जास्तीत जास्त खेळाडू पोहोचतील. आमदार मुनगंटीवार यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. कारण त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, विकासाची दृष्टी आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव केला.
करीअर फॅक्टर..
स्पोर्ट्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी करिअर फॅक्टर बनणार आहे. विद्यार्थ्यांना नवनव्या संधी मिळणार आहेत. यामधून त्यांचे करीअर घडणार आहे. क्रिकेट, फुटबॉल या खेळांना जगभरात लोकप्रियता आहे. त्याच पद्धतीने पारंपरिक खेळांना लोकप्रियता मिळाली पाहिजे. या महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला ते काम करायचे आहे, असे आवाहन मंत्री खडसे यांनी विद्यार्थ्यांना केले. आयुष्यात शिस्त, टाईम मॅनेजमेंट, मानसिक दृष्या सक्षम राहायचे आहे, असे वाटत असेल तर मैदानावर उतरलेच पाहिजे. जय-पराजय महत्त्वाचा नाही. तर सहभागी होणे महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोबाईलमधून बाहेर पडा..
आजच्या डिजीटल टेक्नॉलॉजीच्या युगात मुले डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात. पूर्वी पालक म्हणायचे, ‘जास्त वेळ खेळू नको. सायंकाळी लवकर घरी ये.’ पण आजचे पालक म्हणतात की, ‘थोड्यावेळ तरी बाहेर जा. मोबाईलमधून बाहेर निघ.’ ही वेळ बदलली आहे. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असंही त्या म्हणाल्या.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी दिले चंद्रपूर-गडचिरोलीच्या तरूणांच्या स्वप्नांना पंख !
विकास बघायला दोन दिवस लागतील..
एका दिवसात चंद्रपूरचा विकास बघणे शक्य नाही. किमान दोन दिवस लागतील. यानंतर मी दोन दिवसांकरिता चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हिजनमधून जी कामं झाली आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हा परिसर विकसित केला, तसेच काम मलासुद्धा माझ्या मतदारसंघात करायचे आहे. मी हे करू शकले तरच माझ्या पदाला न्याय देऊ शकेन, असे रक्षा खडसे म्हणाल्या.