Ram Shinde Vs Ajit Pawar : पराभवामागे पवार कुटुंबाचा कट

Ram Shinde makes serious allegations against Ajit Pawar : राम शिंदे यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

Baramati : विधान परिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं होतं. या विधानावरून राम शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, अजित पवारांचे वक्तव्य म्हणजे मला वारंवार टॉर्चर करण्याचा प्रयत्न आहे. कर्जत – जामखेड मतदारसंघातील माझ्या पराभवामागे पवार कुटुंबातील अघोषित करार आणि नियोजित कट होता. अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत, त्यामुळेच माझा पराभव 1243 मतांनी झाला.

Bacchu Kadu : सरकारमधील लोकांकडून मतदारांची लिस्ट बदलण्याची होती ऑफर!

शिंदे यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव समोर आला आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या आरोपांचा समाचार घेत राम शिंदेंचा गैरसमज झाला आहे. असा दावा केला आहे.

Local Body Elections : आक्षेपानंतर गण-गटांच्या प्रारूपात दोन बदल

इस्लामपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार म्हणाले होते, मी भावकीकडं लक्ष दिलं, त्यामुळे तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा की किती मतं पडली आहेत. पोस्टल बॅलेटवरून निवडून आला आहेस. त्यामुळे माझ्या कुणी नादाला लागू नका. या विधाना नंतर भाजप नेते राम शिंदे यांनी थेट अजित पवारांना लक्ष्य करत पराभवामागील कटाचा मुद्दा उचलून धरल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.