She will be participating in the Women’s Kesari Competition to be held in Deoli on January 24th : २४ जानेवारीला देवळीत आयोजित महिला केसरी स्पर्धेत तिचा सहभाग राहणार आहे
Wardha News : महिला कुस्ती खेळातील ६८ किलो वजन गटात स्थानिक मल्ल खुशाली विलास चौधरी हिने भरारी घेतली. तिने कुस्ती खेळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कलर होल्डर पटकाविला. कुस्तीत कलर होल्डर पटकाविणारी खुशाली देवळीतील दुसरी मल्ल ठरली आहे. यासाठी माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कलर होल्डर म्हणून तिने ख्याती मिळविली आहे. सोबतच तिने पंजाबमधील गुरुकाशी विद्यापीठाच्यावतीने आयोजित ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल कुस्ती स्पर्धेत सहभाग नोदवला आहे. नागपूर विद्यापीठाची प्रतिनिधी म्हणून तिने या स्पर्धेत आपल्या गुणांची चमक दाखविली.
Dr. Pankaj Bhoyar : महाराष्ट्राला देशातून तिसरा क्रमांक, कोणार्क येथे खाणमंत्र्यांची परिषद !
कुस्ती खेळातील खुशालीच्या यशाबद्दल माजी खासदार रामदास तडस यांनी आनंद व्यक्त केला, तसेच तिचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. यावेळी तिचे वडील विलास चौधरी व नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांची उपस्थिती होती.
Employment Guarantee Scheme : उधारीवरच राबायचे?, मजुरीला हरताळ, निधी रखडला !
६८ किलो वजनगटात खुशाली ही वर्धा जिल्ह्यातील एकमेव मानकरी ठरली. शिवाय अल्लीपूर येथे आयोजित दंगलीमध्ये द्वितीय स्थान पटकाविल्याने तिला वर्धा केसरीचा सन्मान देण्यात आला. यापूर्वी माजी खासदार रामदास तडस यांनी सन १९६८ ला नागपूर विद्यापीठातून कुस्तीचा कलर होल्डर मिळविला होता. सध्या खुशाली ही वर्धाच्या अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेक.च्या अंतिम वर्षाची तयारी करीत आहे. येत्या २४ जानेवारीला देवळीत आयोजित महिला केसरी स्पर्धेत तिचा सहभाग राहणार आहे. यावेळी तीचे कुस्तीतील नवे डावपेच पाहता येणार आहेत.








