Ramesh -Chennithala- remained -in Maharashtra Congress after- even-poor- performance : विविध राज्यांचे प्रभारी जाहीर परंतु महाराष्ट्रात बदल नाही
Nagpur अखिल भारतीय काँग्रेस समितीने विविध राज्यांचे प्रभारी बदलले. परंतु, महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही केरळचे रमेश चेन्नीथला यांना कायम ठेवले आहे. महाराष्ट्राच्या ६५ वर्षांच्या इतिहासात इतके कमी आमदार निवडून आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे आहे. निवडणूक झाली, निकाल लागला, दारूण पराभव झाला. प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा आला, तोही स्वीकारला गेला. मात्र चेन्नीथला यांचे महाराष्ट्रात ठाण मांडून बसण्याचे गुपित अद्याप कळू शकलेले नाही.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने नुकतेच विविध राज्यांचे प्रभारी जाहीर केले. यात बिहार, पंजाब, ओडीसा, पूर्वोत्तर राज्यांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्राला यातून वगळले आहे. केरळचे काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांच्याकडे महाराष्ट्राचा प्रभार कायम राखला आहे. त्यांच्यासोबत हिंदी भाषेत संपर्क साधणे तेवढे सोपे नाही.
Manikrao kokate : कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भडकली वंचित !
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना त्यांच्यासोबत हिंदीत संवाद साधणे अवघड जाते. तरीही काँग्रेसने हिंदी योग्यरितीने न समजणाऱ्या नेत्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. या नव्या रचनेत चेन्नीथला यांच्याजागी दुसऱ्यांची नियुक्ती होईल, असे बोलले जात होते. परंतु प्रदेशाध्यक्षासोबतच प्रभारीची नवी जोडगोळी येईल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाटत होते. परंतु चेन्नीथला यांना महाराष्ट्रात कायम राखले आहे.
Anandrao Adsul : हा कसला सामाजिक न्याय? योजनाच पोहोचल्या नाहीत!
पदभार १८ फेब्रुवारीला
महाराष्ट्रचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येत्या १८ फेब्रुवारीला पदभार ग्रहण करणार आहेत. मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहे. बुलडाणा जिल्ह्याला प्रदेशाध्यक्ष अनेक वर्षांनी मिळालेले आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.