Demand to resume soybean purchases : सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याची रणधीर सावरकरांची मागणी
Akola विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सभागृहात मांडल्या. नाफेडमार्फत NAFED केवळ 30 टक्के सोयाबीन खरेदी करण्यात आल्याने उर्वरित सोयाबीनचे काय होणार, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी नाकारणे दोन वेळा मुदत वाढ देऊनही शेतकऱ्यांसाठी संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नाही. नोंदणी करण्यात आलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे आजही सोयाबीन शिल्लक आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सरकारकडून नाफेडद्वारे खरेदी करण्याची अपेक्षा ठेऊन आहे.
Salil Deshmukh : काटोलच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची अर्थसंकल्पात घोषणा !
सावरकर म्हणाले, ‘यापूर्वी दिलेल्या मुदतीत सरकार सर्व सोयाबीन खरेदी करू शकले नाही. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा असून, सरकारने तातडीने उपाययोजना करावी. तसेच, सहभागी शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळावा.” काका प्रश्नावर किंवा ऊस उत्पादकांच्या अडचणी सोडवताना सर्व एकत्र येतात. मात्र, सोयाबीन शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार होत नसल्याचेही सावरकर म्हणाले.
यावर उत्तर देताना राज्याचे पणन मंत्री म्हणाले, “सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या ज्ञात आहेत. आतापर्यंत 13 लाख टन सोयाबीन नाफेडमार्फत खरेदी करण्यात आले आहे. संपूर्ण सोयाबीन खरेदी करणे शक्य नसले तरी उर्वरित सोयाबीन खरेदीसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल.” सरकारच्या या उत्तरावर समाधान व्यक्त करत आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.