Breaking

Randhir Sawarkar : ‘स्वारगेट’ नंतर आमदारांनी घेतली अकोला बस स्थानकांची झाडाझडती!

After ‘Swargate’, MLAs raid On Akola bus stations : आमदार सावरकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या

Akola : एसटी प्रवाशांना उत्तम सुविधा मिळाव्या आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, या उद्देशाने आमदार रणधीर सावरकर यांनी शनिवारी (१ मार्च) मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली. त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर आमदारांनी अकोल्यातील बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत झाडाझडती घेऊन आवश्यक सूचना सुद्धा दिल्या.

शहरातून विविध तीर्थस्थळे तसेच शेगाव, तेल्हारा आणि लांब पल्ल्यासाठी नवीन गाड्या सुरू करण्याची गरज, बसस्थानकामधील पाण्याची समस्या, तसेच बांधकामामुळे होणारा त्रास यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच दहीहंडा ग्रामीण भागाला जोडणाऱ्या एसटी गाड्यांची माहिती घेत प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

Eknath Shinde : कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही!

आमदार सावरकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि राज्य शासनाकडे त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्या अचानक भेटीमुळे काही अधिकाऱ्यांची अनुपस्थिती जाणवली. यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत, भविष्यात अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.

Vijay Wadettiwar : थोडी तरी लाज बाळगा रे..!

अकोला जिल्ह्यासाठी २२० नवीन एसटी बसेस..
अकोला जिल्ह्यासाठी २२० नवीन एसटी बसेस दाखल होणार आहेत. परिवहन मंत्र्यांसोबत यासंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच, बॅटरीवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यासाठी चार्जिंग सेंटरच्या उभारणीचे काम सुरू असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.