Randhir Sawarkar : हरभरा खरेदी तात्काळ सुरू करा !

MLA Randhir Savarkar’s demand to Chief Minister Devendra Fadnavis and Marketing Minister Jayakumar Rawal : आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांकडे मागणी

Akola : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम २०२४-२५ साठी हरभरा खरेदी योजना तातडीने सुरू करावी, तसेच राज्य शासनाच्यावतीने रब्बी पणन हंगाम २०२४-२५ करिता ज्वारी खरेदी योजना त्वरीत लागू करावी, अशी आग्रही मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतात हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र, विक्रीसाठी आवश्यक असलेली नाफेडच्या खरेदी योजनेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांकडील हजारो क्विंटल हरभरा विक्रीअभावी गाठीला बांधून पडला आहे. शासनाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेत कमी दराने हरभरा विकावा लागत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने तातडीने खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, नाफेडने अद्याप खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Bank Fraud : खासदारांच्या पत्रालाही केराची टोपली !

ज्वारी उत्पादन, विक्रीचा प्रश्न ऐरणीवर..
यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्वारी उत्पादन घेतले आहे. मात्र, शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ज्वारी खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. परिणामी, हजारो टन ज्वारी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. योग्य बाजारपेठ आणि खरेदी योजना नसल्याने शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून तातडीने ज्वारी खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाफेड व मार्केटिंग फेडरेशनला तातडीच्या सूचना द्याव्या..
हरभरा आणि ज्वारी खरेदी योजनांसाठी नाफेडने तातडीने कार्यवाही करावी आणि खरेदी केंद्रे तसेच सब-एजंट संस्थांची नियुक्ती करावी, अशी मागणीही आमदार सावरकर यांनी केली आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनला तातडीच्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत केली आहे.

Harshawardhan Sapkal : फडणविसांना अतिरिक्त काम झेपत नाहीये

शेतकऱ्यांच्या हितासाठी हरभरा आणि ज्वारी खरेदी योजनांना लवकरात लवकर गती मिळावी आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, अशीच शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.