MLA turns aggressive over the case of a minor girl’s suicide : अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आमदाराची मागणीणी
Akola गीता नगर येथील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. शाळेच्या संचालक मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे आणि आरोपीकडून सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केली. शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात मांडली.
नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार सावरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, अकोल्यातील केवळ १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून, तिला मागील सहा महिन्यांपासून एका व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी शाळेला तसेच पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीकडे योग्य दखल न घेतल्याने अखेर मुलीला टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचा आरोप सावरकर यांनी केला.
winter session : जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!
या पार्श्वभूमीवर, गीता नगर येथील सेंट अॅन्स या शाळेच्या प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून शाळेविरुद्ध कारवाई करावी, तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घ्यावा, असा ठोस आग्रह त्यांनी सरकारकडे धरला. संबंधितांनी दुर्लक्ष केले असल्यास त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar : विदर्भ-मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन करा
आमदार सावरकर यांनी या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र भावना सभागृहात मांडत, “निर्दोष मुलीचा बळी ही गंभीर आणि दखलपात्र बाब आहे. प्रशासनाची जबाबदारी ठरवलीच पाहिजे,” असे सांगून तातडीच्या कारवाईची मागणी केली.








