Register to buy Pigeon Peas with ‘Minimum Support Price : आमदार रणधीर सावरकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
Akola हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांची पाच पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावात तूर खरेदीसाठी तातडीने नोंदणी करावी, असं आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण Shivrajsingh Chuhan आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असही ते म्हणाले.
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस विधिमंडळ प्रतोद रणधीर सावरकर यांनी केले आहे.
२०२४-२५ या वर्षात महाराष्ट्र शासनाने शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू केली आहे. प्रति क्विंटल ७५०० रुपये दराने खरेदी केली जाणार असून, १३ फेब्रुवारी २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात साधारणतः जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तूर उत्पादन बाजारात विक्रीसाठी येते. यामुळे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे, असं सावरकर म्हणाले.
कृषी खात्याच्या उत्पादकता अंदाजानुसार, राज्यात एकूण १२ लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली असून, यंदा ११.९० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. यापैकी २५ टक्के म्हणजेच २.९७ लाख टन तुरीची खरेदी शासन करणार आहे. शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
तातडीने नोंदणी करा..
शासकीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सावरकर यांनी केले आहे.