water entered the house due to a cloudburst : आमदारांनी घेतली बाधितांच्या भेट, महापालिका लागली कामाला
Akola गुडधी आणि उमरी परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला त्वरित मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले.
बाधित नागरिकांशी संवाद साधून संबंधितांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. महसूल विभागाला तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देत त्यांनी प्रभावित नागरिकांना मदत पुरविण्याचे निर्देश दिले. तसेच, त्या भागातील वीज पुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना केल्या.
OBC Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक !
आपत्कालीन व्यवस्थेच्या माध्यमातून महानगरपालिका अधिकाऱ्यांना तत्काळ पावले उचलण्याचे आदेश आमदार सावरकर यांनी दिले. या भेटीदरम्यान विजय अग्रवाल, जयंत मसने, माधव मानकर, विवेक भरणे, संदीप गावंडे, मिलिंद राऊत, डॉ. अमित कावरे, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, अॅड. देवाशिष काकड, पल्लवी मोरे, गणेश लोड, अनुराधा नावरे, अर्चना मसने, विपुल घोगरे, गणेश तायडे, शिवलाल इंगळे आणि सुनिता अग्रवाल यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा;
दरम्यान, आयुक्त डॉ. सुनील लहाने तसेच बांधकाम, आरोग्य, अतिक्रमण आणि आपत्कालीन व्यवस्थेच्या विभागातील अधिकारीही उपस्थित राहून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले होते.