Response to Nitesh Rane’s criticism on Aditya Thackeray : नितेश राणेंच्या आदित्य ठाकरेंवरील टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
Mumbai : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणताही गैरप्रकार नाही, ती आत्महत्या होती, असे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना क्लीनचीट मिळाली. मात्र ठाकरेंवर कायम टीका करणाऱ्या राणेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केली. यावर ठाकरे गटाच्या वतीने त्यांना प्रत्युत्तर देताना उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा हा तर जुहूचा निब्बर… या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. तिथून निघत असाताना नेमकं आ. आदित्य ठाकरेही समोर आले. त्यामुळे, राणे-ठाकरे आमने-सामने आल्याचे दिसले. यावेळी, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. लहान आवाजात.. ये चला.. चला… असं म्हणत राणेंनी आदित्य ठाकरेंना चिडवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील व्हिडिओही समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
Sandip Joshi : मतिमंद शाळेवर संकट, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणार्या आरोपा संदर्भाने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, खा. संजय राऊत यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, त्यांनी नाक घासून माफी मागावी, असे म्हटले होते. नितेश राणेंनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. राणेंनी केलेल्या आदित्य ठाकरेंच्या मिमिक्रीवर आता ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी बोचरी टीका करत नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.
Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिनचीट…
उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबडीसारखा ‘ किकीक’ करणारा असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर — ओळखा पाहू कोण? अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणेंवर बोचरी टीका केली आहे.
दिशा सेलियन प्रकरण पुन्हा तापले आहे. ठाकरे कुटुंबीयांवर कायम टीका करणार आहे राणे कुटुंबांनी दिशाचे आत्महत्या प्रकरण चांगलेच उचलून धरले होते.