Breaking

Rape case registered : १३ वर्षांची मुलगी म्हणाली, ‘पोटात दुखतय’, डॉक्टर म्हणाले, Pregnant आहे!

A 13-year-old girl turned out to be pregnant : आईला बसला धक्का; २१ वर्षांच्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

Nagpur आठवीत शिकणाऱ्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

आईने आस्थेने चौकशी केली असता तिने प्रियकराबाबत माहिती दिली. आईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी मुलिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. जयेश नरेश गभने (२१, रा. वानाडोंगरी, एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur Police : कारने Stunt केला, पोलिसांनी शोधून काढले, गुन्हा दाखल!

१३ वर्षीय पीडित मुलगी ही आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती वानाडोंगरीतील एका शिकवणी वर्गाला जात होती. शिकवणी वर्गाच्या बाजुच्या इमारतीत आरोपी जयेश गभने हा युवक राहतो. तो बी.ए. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. दोघांची ओळख झाली. मुलाने तिला अभ्यासात मदत करण्याचे आमिष दाखवून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. काही दिवसांतच दोघांचे सूत जुळले.

दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. जयेशने गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत होता. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती झाली. मंगळवारी मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, बुधवारी तिने आईकडे पुन्हा तक्रार केल्यामुळे आईने तिला डॉक्टरांकडे नेले.

Water shortage : मोठं संकट! ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई?

डॉक्टरांनी तपासणी करुन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तिच्या आईला धक्का बसला. आईने मुलीची कसून चौकशी केली असता जयेश गभने याचे नाव समोर आले. त्यामुळे आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन जयेशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. जयेशला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.