Forced religious conversion in tribal communities is violence : कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप; आदिवासींना सहकार्य करण्याची भावना आवश्यक
Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षांपासून बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. धर्माच्या प्रचार-प्रसाराला आमचा विरोध नाही, पण त्यासाठी बळजबरी करणे कायमच निषेधार्ह आहे, अशी भूमिका यापूर्वी अनेकदा संघाने घेतली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Dr. Mohan Bhagwat यांनी पुन्हा एकदा याचा उल्लेख केला. आदिवासी समाजातील समस्यांवर भाष्य करताना रोखठोक भूमिका घेत त्यांनी धर्मांतरणाची बळजबरी हिंसाच असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री व आदिवासी नेते अरविंद नेताम देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप रेशीमबाग मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी हे आपल्या समाजाचाच हिस्सा आहे. धर्मांतरण व इतर समस्यांसंदर्भात आदिवासी समाजाला सोबत घेऊन आम्ही शक्य ते सहकार्य करू. शासन, प्रशासन सहायक असू शकतात, मात्र संबंधित लोकांनीदेखील कामात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
Dilip Sananda Resigns : सानंदांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची दुसरी फळी अॅक्टिव्ह
त्याचवेळी त्यांनी आदिवासी समाजातील धर्मांतरणाच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणाचा मुद्दा गंभीर आहे. भारतीय संस्कृतीचे मूळ आदिवासी समाजातच आहे. त्यांनी देशाची परंपरा जपली आहे. अश्यात कुणी स्वतःहून मनापासून पूजेची पद्धती बदलत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, आमिषं दाखवून व जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचे आहे. असे धर्मांतरण ही हिंसाच आहे.’ अशा पद्धतीने धर्मांतरण झालेली व्यक्ती घरवापसी करत असेल तर तिचा स्वीकार करायला हवा, असंही ते म्हणाले.
Dilip Sananda resigns : अखेर दिलीप सानंदा यांचा राजीनामा, काँग्रेसला धक्का!
सर्वपक्षीय नेत्यांमधील सामंजस्य
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. याप्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली. संरक्षणविषयक विविध संशोधन किती आवश्यक व कामाचे आहेत हे सिद्ध झाले. केंद्र शासनाची दृढता दिसून आली. महत्त्वाचे म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांचा समजूतदारपणा व परस्पर सहयोगदेखील जगाने पाहिला. संपूर्ण समाजाने आपल्या एकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. जर अशी भावना चिरंतर राहिली तर सुदृढ लोकशाहीचे दृश्य यातून समोर येईल, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.