Raut Vs Mahajan : गिरीश महाजन फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही

Sanjay Rauts Attack on Girish Mahajan : संजय राऊतांचा गिरीश महाजन यांच्यावर घणाघात

Mumbai : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणातून एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर राज्यात राजकीय आरोप – प्रत्यारोपांना सुरू झाले आहेत. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय, तो फडणवीसांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात केला आहे.

शनिवारी रात्री पुण्यातील खराडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हे सर्व एकनाथ खडसे यांच्यावरील सूडबुद्धीने केलेले कारस्थान असल्याचा आरोप केला. संजय राऊत म्हणाले, एकनाथ खडसे दोन दिवसांपासून सरकार विरोधात आणि विशेषतः गिरीश महाजन यांच्या विरोधात ठामपणे बोलत आहेत. त्यांनी काही गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांच्या कुटुंबीयावर कारवाई झाली. खडसे जे आरोप करतात त्यांची चौकशी होत नाही, पण आरोप करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, अशी टीका त्यांनी केली.

Chandrashekhar Bawankule : शरद पवार – देवेंद्र फडणवीस भेटीचा फायदा शेतकऱ्यांना होईल !

राऊत म्हणाले, संपूर्ण भारतीय जनता पक्ष म्हणजे एक मोठी रेव्ह पार्टी आहे. गिरीश महाजन हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश देतात, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातात. त्यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या दोन नेत्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी दबाव टाकला आणि गुन्हे मागे घेतले, असा आरोपही त्यांनी केला.याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांवरही भाजपात जाण्यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आणि भाजपात गेल्यानंतर ते रद्द करण्यात आले, असे आरोप करत राऊत म्हणाले की, हे नवीन तंत्र आहे विरोधकांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करा आणि पक्षात घेतल्यानंतर सर्व माफ करा.

Ladiki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील मोठा गैरव्यवहार उघड !

गिरीश महाजन यांच्यावर थेट शब्दात टीका करत संजय राऊत म्हणाले, गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय, जर याला आवर घातला नाही, तर एक दिवस तो देवेंद्र फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही. राऊत यांनी भाजपवर आणखी आरोप करत सांगितले की, अनेक आमदार-खासदार हे भाजपच्या हनी ट्रॅप आणि नशेच्या पार्टीमुळे पक्ष सोडून गेले आहेत. नशेच्या पार्टीशिवाय हनी ट्रॅप रचता येत नाही, आणि हे सर्व भाजपच्या माध्यमातून घडते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Crime N : रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, पाच जणांना रंगेहाथ पकडले

संजय राऊत यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, आमच्यावर ईडी, सीबीआय, पोलिस सगळं पाठवून झालं. आम्ही लढतो आहोत आणि लढत राहू. पण हे तुमच्यावर उलटेल, तेव्हा त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल.
एकूणच, पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाच्या निमित्ताने राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, भाजप आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

_____